नागभीड भाजप कार्यालय येथे प्रथम कन्यारत्न कुटुंबाला पाच हजार रुपयांचे धनादेश वाटप.

जि.प. उपाध्यक्षा तथा प्रभारी सभापती सौ रेखाताई कारेकर यांची प्रमुख उपस्थिती.
Bhairav Diwase. July 20, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
नागभीड:- आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भांगडीया फाउंडेशन च्या माध्यमातून प्रथम कन्या झालेल्या लाभार्थ्यांना 5 हजार रुपये धनादेश देऊन पुढील 23 वर्षात 40 हजार रुपये लग्न कार्या साठीची लोकोपयोगी योजना अंमलात आणली आहे.

भाजप कार्यालय नागभीड येथे स्व धापुदेवी गोटुलालजी भांगडीया स्मृती प्रित्यर्थ प्रथम कन्या झालेल्या लाभार्थ्यांना 5 हजार रुपयांचा धनादेश वाटप नागभीड पंचायत समिती प्रभारी सभापती तथा जि. प उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर यांचे हस्ते देण्यात आले.

यावेळी जि. प सदस्य संजय गजपुरे भाजप तालुका अध्यक्ष तथा पस सदस्य संतोष रडके आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत