शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावे अन्यथा मनसे तर्फे पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करू:- भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, मनीषा तोकलवार

Bhairav Diwase
जर शाळा सुरू झाली तर आम्ही स्वतः कायदा हातात घेऊ पण शाळा सुरू करू देणार नाही.
Bhairav Diwase. July 21, 2020 

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- गडचिरोली जिल्हा सोबत चंद्रपुर जिल्ह्यात येत्या ४ ऑगस्ट पासून प्रायोगिक रित्या पूर्ण शाळा सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. याच निर्णयाचा विरोध करत आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून Covid-19 चा चंद्रपुर जिल्ह्यात सुरू असलेला रोज रोज नवीन पॉझिटिव पेशंट ज्या प्रकारे समोर येत आहे. ती स्थिती पाहत सध्या शाळा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत निंदनीय आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावे अन्यथा मनसे तर्फे पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करू या साठी पत्र देण्यात आले. व जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलेले आहे. यानंतर ही जर शाळा सुरू झाली तर आम्ही स्वतः कायदा हातात घेऊ पण शाळा सुरू करू देणार नाही असा इशारा ही देण्यात आला. यावेळी भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर आणि मनीषा तोकलवार यांची उपस्तिथी होती.