Top News

रोट्रॅक्ट क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर टाऊन च्या माध्यमातून चंद्रपूर महानगरातील 21 गणेश मंडळांना कचरा कुंडी, मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम च्य गोळ्याच वाटप.

रोट्रॅक्ट क्लब ऑफ स्मार्टसिटी चंद्रपूर टाऊन तर्फे घेण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम.

क्लब मार्फत घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्व गणेश मंडळांनी केले. व समोरच्या उपक्रमांसाठी व कार्यक्रमांसाठी दिल्या शुभेच्छा.
Bhairav Diwase. Aug 30, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- रोट्रॅक्ट क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर टाऊन च्या माध्यमातून चंद्रपूर महानगरातील 21 गणेश मंडळांना स्वच्छतेचा विषय लक्षात घेऊन कचरा कुंडी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव व कॉविड-19 ची कठीण परिस्थिती लक्षात घेऊन मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम च्य गोळ्या देण्यात आल्या व शासनाने दिलेल्या निर्देशानुसार गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
रोट्रॅक्ट क्लब ऑफ स्मार्टसिटी चंद्रपूर टाऊन तर्फे घेण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम होता. क्लब मार्फत घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्व गणेश मंडळांनी केले व समोरच्या उपक्रमांसाठी व कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ स्मार्टसिटी चंद्रपूर च्या चार्टर प्रेसिडेंट डॉ. विद्या बांगडे, प्रेसिडेंट रो. रमा गर्ग यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
क्लबचे प्रेसिडेंट रो. यश बांगडे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम घेण्यात आला. तसेच या प्रकल्प संचालिका म्हणून रो.रुचिता गर्गेलवार यांनी यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली.
सोबतच उपाध्यक्ष रो. स्नेहित लांजेवार,सचिव मुर्तझा बोहरा,सहसचिव रो.रोहित कन्नमवार, कोषाध्यक्ष रो.प्रतीक हरणे, संचालक रो. कुणाल गुंडावार, रो. रोहित भोयर, रो. मोनिका चौधरी, रो. पायल गोंनाडे, रो. मनीष पिपरे, रो. अक्षता चिल्लूरे व रो. यश गोंनाडे यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने