जामतुकुम येथे लंप्पी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आज दिनांक 22 ऑगस्ट ला लसीकरण शिबिर संपन्न.

Bhairav Diwase
आधार न्यूज नेटवर्क'ला प्रकाशित झालेल्या बातमीची प्रशासनाने घेतली दखल.
Bhairav Diwase. Aug 22, 2020



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्गजन्य रोग लंपीस शेतकऱ्यांची झोप उडविलेली आहे. ऐन कामाच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झालेले आहे. लंप्पी हा रोग संसर्गजन्य असल्याने आजारी जनावरांची संख्या फार झपाट्याने वाढत आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकुम येथील गाई, बैल यांच्या वर लंप्पी रोगाचा प्रसार होत असल्याने लवकरात लवकर जामतुकुम येथे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात यावे अशी मागणी सरपंच बोधलकर, ग्रामस्थांनी केली होती.

लंप्पी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत मागूनही मदत न मिळाल्याने सरपंच भालचंद्रभाऊ बोधलकर आणि ग्रामस्थामध्ये नाराजी.

या हॅडीगने दिनांक. 19 ऑगस्ट 2020 या तारखेला आधार न्यूज नेटवर्क'ला बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची प्रशासनानेेे दखल घेतली. व सरपंच तसेच ग्रामस्थांच्याा मागणीनंतर प्रशासनाने दखल घेत जामतुकुम येथे लंप्पी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आज दिनांक 22 ऑगस्ट ला लसीकरण शिबिर संपन्न झाला. श्री राहुल भाऊ संतोषवार जिल्हा परिषद सदस्य यांनी जामतुकुम येथे जाऊन लसीकरण शिबिरांना भेट दिली त्या वेळेस ग्रामपंचायतचे सरपंच भालचंद्रभाऊ बोधलकर, ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, डॉक्टर्स आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 
        ग्रामपंचायत सरपंच भालचंद्र भाऊ बोधलकर, ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच जामतुकुम येथील ग्रामस्थांनी आधार न्यूज नेटवर्क परिवाराचे आभार मानले आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रशासनाने धन्यवाद!