टास्क पूर्ण न झाल्याने 19 वर्षीय युवकाने घेतला गळफास.
Bhairav Diwase. Aug 22, 2020
भद्रावती:- माजरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 6 येथील पब्जी या गेमने गौरव पाटेकर नामक युवकांचा गेम केला.
सध्या देशात युवक वर्गात पब्जी या गेमची लत लागलेली आहे, या गेम मध्ये टास्क पूर्ण न झाल्याने युवक वर्ग वारंवार गेम सुरू करून कोणतेही लक्ष न वगळता या गेमच्या आत स्वतःला झोकून देत असतो, कधीकधी तर युवक एकट्या मध्ये जोराने ओरडायला लागतो.
नागपूरच्या उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या रायसोनी महाविद्यालयात 19 वर्षीय गौरव पाटेकर हा युवक बी.कॉम मधील पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता, अभ्यासात हुशार गौरव असा अचानक जाणार हे घरच्यांना पण ठाऊक नव्हतं.
देशात कोरोना आला आणि पूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले त्यावेळी गौरव हा आपल्या स्वागावी माजरी मध्ये आला, मागील 5 महिन्यापासून गौरव हा पब्जी गेम खेळत होता, त्याची लत त्याला इतकी लागली होती की जेवणाच सुद्धा त्याला काही भान नव्हते.
गौरवने गळफास घेण्याआधी मित्राला कॉल करून मी जात आहो असे म्हणत फोन ठेवला, मित्राने तात्काळ गौरवच्या मोठ्या भावाला फोन करून माहिती दिली, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
गौरव आपल्या रूम मध्ये फासावर लटकत होता, तरुण मुलाच्या मृत्यूने पाटेकर परिवारात दुःख कोसळले.
गौरवचे काका नागाजी पाटेकर यांनी सांगितले की गौरवला पब्जी गेमची खूप छंद लागला होता, तो नेहमी एकांतात हा गेम खेळत होता, वारंवार घरच्या लोकांनी त्याला समजवायचा प्रयत्न सुद्धा केला परंतु हा छंद त्याचा जीव घेणार याची कुठलीही कल्पना घरच्या सदस्यांना नव्हती.