सावली तालुक्यात 8 व्या कोरोना रुग्णाची नोंद.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यात 8 व्या कोरोना रुग्णाची नोंद झालेली आहे. सावली तालुक्यात हिरापूर या गावातीलच पुन्हा 5 व्या रुग्णाचा कोरोना अहवाल हा पॉजिटीव्ह आलेला आहे. हिरापूर गावातीलच एकाच कुंटुंबातील चार कोरोना रुग्णांची नोंद झालेली होती. परंतु आज दि. 16 ला हिरापूर गावातीलच घेतलेल्या तपासणी नमुन्यामध्ये एका दुसऱ्या व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल हा पॉजिटीव्ह आलेला आहे. यामुळे हिरापूर गावात एकूण कोरोना पॉजिटीव्ह ची संख्या 5 झाली तर सावली तालुक्यातील इतर तीन आणि हिरापूर मधील पाच अशाप्रकारे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 8 झालेली आहे. यामुळे पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावकरी तसेच रुग्णांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे. हिरापूर गावातील नागरिकांनी हिरापूर लॉकडाऊन ला सहकार्य करून आपल्या तसेच आपल्या परिवारातील लोकांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.