शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरी बिडकर येथील घटना.
Bhairav Diwase. Aug 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर: - दिनांक.१८/०८/२०२० सावरी बिडकर येथे शेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व पो.हवा.क्षिरसागर हे दारू विक्री संदर्भात तपासणी करीता गेले असता दारू माफिया संदीप ठवरे, सुधीर ठवरे , सतीराम ठवरे यांनी पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व पो.हवा क्षिरसागर यांना मारहाण करण्यात आली.
असून सवारी बिडकर या गावामध्ये दारू माफियांची दादागिरी मोठ्या प्रमाणावर वाढली असून ठाणेदारांचा सुद्धा विचार करण्यात येत नाही. मग गोपनीय माहिती देणाऱ्या बद्दल माहिती मिळाली कि काय होईल याचा विचार पडला असून प्रशासनाचा जेव्हा ऎकत नाही तर सर्व सामान्यांचा कस ऐकणार? जनतेसमोर निर्माण झाला आहे.