आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची राहणार उपस्थिती.
Bhairav Diwase. Aug 28, 2020
चिमूर:- कोरोना दरम्यान राज्य शासनाने लाकडाऊन केल्याने राज्यातील मंदिर बंद करण्यात आले होते मंदिरे सुरू करा या मागणीसाठी आध्यात्मिक समनव्यक आघाडी च्या माध्यमातून राज्यभरात घंटानाद आंदोलन दार उघड उद्धवा दार उघड आंदोलन दि २९ ऑगस्ट सकाळी ११ वा. श्रीहरी बालाजी मंदिर चिमूर समोर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे या आंदोलनात भाजपा, भाजयुमो महिला आघाडी च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन चिमूर भाजपा कार्यालयातून कार्यालयप्रमुख अरुण लोहकरे यांनी केली आहे.