पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगांव ते गंगापूर टोक या रस्‍त्‍यावर मोठया पुलाच्‍या बांधकामसाठी 11 कोटी 42 लक्ष 58 हजार रू. निधी मंजूर.

Bhairav Diwase
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.

लवकरच कामाला होणार सुरुवात.
 Bhairav Diwase.    Aug 28, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नक्षलग्रस्‍त भागाच्‍या विकासाकरिता केंद्र शासनाच्‍या आरसीपीएलडब्‍ल्‍युई या योजनेअंतर्गत पोंभुर्णा या नक्षलग्रस्‍त तालुक्‍यातील जुनगांव ते गंगापूर टोक या रस्‍त्‍यावर मोठया पुलाचे बांधकाम करण्‍यासाठी 11 कोटी 42 लक्ष 58 हजार रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे.
नक्षलग्रस्‍त भागाच्‍या जलद विकासाच्‍या दृष्‍टीने रस्‍ते जोडणी कार्यक्रम केंद्र शासनातर्फे राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत जुनगांव ते गंगापूर टोक या रस्‍त्‍यावर मोठया पुलाचे बांधकाम करावे यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र शासनाकडे सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. त्‍यांच्‍या या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले असून जुनगांव ते गंगापूर टोक या रस्‍त्‍यावर मोठया पुलाचे बांधकाम करण्‍यासाठी 11 कोटी 42 लक्ष 58 हजार रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. सदर पुलाच्‍या बांधकामाबाबत या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. आ. मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी ही मागणी आता पूर्णत्‍वास आली आहे. सदर कामाचा कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे .

सदर मागणी पूर्णत्‍वास आल्‍याबद्दल जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा तालुका भाजपाध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समितीच्‍या सभापती अल्का आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, पंचायत समितीचे उपसभापती सौ. ज्‍योती बुरांडे, पं.स. सदस्‍य विनोद देशमुख, गंगाधर मडावी आदींनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करत आभार व्‍यक्‍त केले आहे.