वाढदिवसानिमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणचे आयोजन.
Bhairav Diwase. Aug 14, 2020
राजुरा:- सामाजिक कार्यात नेहमी आपली भूमिका बजावणारे, भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आधाडी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष मा. मोहनभाऊ कलेगुरवार सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करून दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत करून वाढदिवस साजरा करण्यात येत होते.
त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा वाढदिवसाच्या आणि स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून माजी आमदार ऍड. संजयजी धोटे आणि जिल्हा परिषद सभापती मा. सुनीलभाऊ उरकुडे यांच्या उपस्थितीत राजुरा येथील वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचं ऋण फेडणे गरजेचे आहे त्यामुळे या प्रकारचे सामाजिक उपक्रम घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांनी केले.
यावेळी माजी आमदार ऍड. संजय धोटे, जिल्हा परिषद सभापती मा. सुनिलभाऊ उरकुडे, भाजपा नेते मा. सतीश धोटे, नगरसेवक राधेश्याम अडनिया, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, गणेश रेकलवार, सुरेश रागीट, संजय उपगणलावार, अनिल दुबे, अर्पित धोटे, भाजयुमो वि. आ. तालुका अध्यक्ष राहुल थोरात, तालुका महामंत्री छबिलाल नाईक, शहर अध्यक्ष सुधिर अरकीलवार, शहर महामंत्री अजयकुमार श्रीकोंडा, विलास खिरटकर, राज कलेगुरवार, राहुल जगत, मारोती इप्पावार, दीपक गोरडवार, नागराज ईपावार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.