Top News

अयोध्येत प्रभु श्रीराम मंदीर निर्माण शुभ प्रसंगी लावारी येथे कारसेवकांचा सत्कार.

Bhairav Diwase.    Aug 05, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- राम जन्मभुमी निर्माण कार्य हा एक आनंदाचा क्षण आहे. सतत 492 वर्ष मंदीरासाठी संघर्ष सुरू होता यासाठी अनेकांनी आंदोलन केले. अनेक कारसेवक तुरूंगात गेले अनेकांनी बलीदान केले. त्यांची स्मृती जागवणारा हा सवर्ण क्षण आहे. दोन कारसेवामुळे न्यायालयाला सुध्दा लवकर सुनावनी करावी लागली आणि सत्याचा विजय झाला. मंदीर निर्माणासाठी जनमानसाचा रेटा होता. नियोजित पध्दतीने व शिस्तीने आंदोलन झाले याचा हा परिणाम आहे.

  राम जन्मभुमी अयोध्या येथे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते  अयोध्येत प्रभु श्रीराम मंदीर निर्माणाचा शुभारंभ होत आहे याची आठवण म्हणुन कारसेकांचा सत्कार केला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जरी असला तरी जनमानसांचा असलेला रेटा आणि दोन कारसेवक यांचे हे फलीत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी भिसी च्या वतीने भिसी आंबोली जिल्हा परिषद क्षेत्रातील लावारी येथील कारसेवक श्री.सुनीलजी अलोनी व नामदेव दडमल या  कारसेवकांचा सत्कार करण्यात आला या वेळी पंचायत समिती सदस्य प्रदीपभाऊ कामडी,भिसी आंबोली जिल्हा परिषद प्रमुख नितीनभाऊ गभने,किशोरजी आष्ट्णकर,ग्राम पंचायत सदस्य देवेंद्रजी मुंगले,युवा नेते आकाशभाऊ ढबाले,बजरंग दल भिसी प्रमुख प्रेमदास कामडी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने