Top News

सावली तालुक्यातील केरोडा येथील शेतकऱ्याचा सर्प दंशाने इसमाचे निधन.

Bhairav Diwase.    Aug 05, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- आज दि. ०५ वाजताच्या सुमारास केरोडा गावातील शेतकऱ्याला शेतीमध्ये काम करताना सापाने चावा घेतल्याने निधन झाले. केरोडा येथील शेतकरी नामदेव शेट्टे हे शेतामध्ये काम करत असताना दुपारी 2 च्या सुमारास सापाने दंश केला. त्यामुळे त्यांचे उपचार करण्यापूर्वीच गावात येताच निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. सदर शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा केरोडा वासीयांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने