भाजपा महिला आघाडी पोंभूर्णा च्या वतीने रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर कोविड-१९ योध्दाचा राखी बांधून आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार.

Bhairav Diwase.    Aug 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- जगा सह भारत देश व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या कोरोना काळात पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी, सफाई कर्मचारी कोरोनाच्या काळात रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. हे दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी योध्ये म्हणून कार्यरत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर भाजपा महिला आघाडी पोभुर्णाच्या वतीने या वर्षी कोरोणा संकटात जनतेच रक्षण करणारे पोलिस स्टेशन पोभुर्णा आणि प्रा. आ केंद्र पोभुर्णा, नगरपंचायत सफाई कर्मचारी यांना राखी बांधून आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले यावेळी सोशल डिस्टंसिंग चे पालन करत. व कमी महिलांच्या उपस्थित कोरोना योध्दाच यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अल्का आत्राम सभापती, श्वेता वनकर नगराध्यक्ष, रजिया कुरेशी उपनगराध्यक्ष, सुनिता मँकलवार नगरसेविका, वैशाली बोलमवार उपाध्यक्ष  ठाणेदार नाईकवाड सर आणि सर्व पोलिस कर्मचारी  डॉ मामीडवार तालुका वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी उमेदचे राजेश दुधे आणि कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत