Click Here...👇👇👇

वर्धा नदीत वाहुन गेलेल्या व्यक्तीचा शोध लागला.

Bhairav Diwase
मृतदेह शोधमोहिमेला तिसऱ्या दिवशी मिळाले यश, किरमिरी जवळ मिळाला मृतदेह.
Bhairav Diwase.    Aug 05, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दिनांक ३ ऑगस्टला दुपारी राजुरा-बामणी रस्त्यावरील वर्धा नदीच्या पुलावरून दुचाकीसह एक व्यक्ती वाहुन गेल्याची घटना घडली होती. काल दुचाकी शोधुन काढण्यात पोलिसांना यश मिळाले होते. दुचाकी राजुरा येथील चुनाभट्टी वॉर्डातील रहिवाशी व प्रतिष्ठित व्यावसायिक ओबय्या दासरी यांची असल्याची माहिती मिळाली. दासरी यांचा हैदराबाद येथे शिक्षण घेत असलेला 22 वर्षीय मुलगा विशाल हा ३ ऑगस्ट पासून राजुरा येथुन बेपत्ता होता. याबद्दल शंकाकुशंका सुद्धा व्यक्त करण्यात येत होत्या. वर्धा नदीत युवक दुचाकी सह वाहुन गेल्याची माहिती शहरात सर्वांना माहित झाली. विशाल हा उशिरापर्यंत घरी आला नसल्याने कुटुंबियांची घालमेल सुरू होती आणि विशालचा शोध घेणे सुरू असतानाच वर्धा नदीच्या पात्रात शोध पथकाला दुचाकी आढळून आली. ही दुचाकी बाहेर काढण्यात आली आहे. ४ ऑगस्ट ला बोटीने दिवसभर, सायंकाळ उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती पण काल त्यात यश मिळाले नाही. आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम राबवली. आज सकाळी ७ वाजताचा सुमारास पोडसा जवळील पुलापासून मृतदेह जातांना मच्छिमारांना आधळला. मच्छिमारांनी लगेच याची सूचना दिली आणि दुपारी १.३० च्या सुमारास धाब्या जवळील किरमिरी येथे बोटीच्या साहाय्याने विशाल दासरी चा मृतदेह काढण्यात यश आले. 
विशाल वय २२ हा राजुरा येथील प्रतिष्ठित व्यावसायिक ओबय्या दासरी यांचा मुलगा आहे. मृतदेहाचा शोध लागताच दासरी कुटुंब, मित्रपरिवार आणि शहरात शोककळा पसरली. विशाल राजुरा येथील नगरसेवक आनंद दासरी यांचा विशाल हा पुतण्या आहे.