Bhairav Diwase. Aug 05, 2020
राजुरा:- ग्रा.प.पाचगाव अंतर्गत असलेल्या मडावीगुडा येथे दि.03.08.2020 च्या रात्रौ अंदाजे 11.00 वाजता येथील आदिवासी गरीब गोविंदराव मडावी या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत 2 गर्भार गायी व 1 बैल जागीच भाजून मरण पावले तर 1 बैल गंभीर जखमी झाला. गोठ्यात असलेले रासायनिक खत कडबा तसेच शेतीचे साहित्य जाळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आज माजी आमदार सुदर्शन निमकर व जी.प. कृषी व पशसंवर्धन सभापती यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व घटनास्थळावरून तहसीलदार, पशू वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून शासनाकडून जे होईल तेवढी भरपाई करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी पाचगाव प.स. सदस्य सौ सूनंदाताई डोंगे,भाजपा नेते हरिदास झाडे, बापूराव मडावी, युवानेते दिपक झाडे, रशिका उद्दे सरपंच, शंकर मेकलवर ग्रामपंचायत सदस्य, गोविंदराव मडावी, महाधू मडावी, विनोद तोडेत्तीवर, अरुण उदे, नारायण मोगलिवर, मोतीराम सिडाम, लिंगु पा. मडावी, जयवंत मडावी, उपस्थित होते.