Top News

पोळ्याच्या दिवशीच वाघाने केले शेतकऱ्याला ठार.

सततच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण.

आज सायंकाळ ५ वाजताची घटना.
Bhairav Diwase. Aug 18, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील नवेगाव शिवारात विरुर वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या कंपार्टमेंट क्र. 145 मध्ये आज संध्याकाळ च्या सुमारास ऐन पोळ्याच्या दिवशी जंगलालगत शेत शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अचानक वाघाने हल्ला करून त्याला जागीच ठार मारल्याची घटना पाच वाजताच्या सुमारास घडली.

राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील वासुदेव कोंडेवार वय 50 वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नांव आहे. वासुदेव कोंडेवार हे आज पोळा असल्याने शेतात बैलांना धुण्यासाठी व चराई साठी शेतात घेऊन गेले होते. शेता लगत जंगल असल्याने बैल चराई झाल्या नंतर परत आणण्यासाठी गेले असता अचानक दबा धरून असलेल्या वाघाने वासुदेव कोंडेवार यांच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार मारले, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल, विरूर वनपरिक्षेत्र अधिकारी इंगळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक वडतकर व सहकारी यांनीं घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

पोळ्याच्या दिवशी सदर घटनेमुळे गावात व परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. सतत होत असलेल्या वाघ्याच्या हमल्याचा घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वही चिंचोली, कवीटपेट, सुब्बई, धानोरा या गावात वाघाने जनावरे फस्त केल्याची घटना घडली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी आता परिसरात जोर धरू लागली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने