वेकोलीच्या मुख्य व्यवस्थापीक संचालक यांना पत्र.
Bhairav Diwase. Aug 24, 2020
चंद्रपूर:- मागील तीन वर्षापासून वेकोलीच्या नागपूर विभागाच्या वतीने मायनिंग सरदार व ओव्हरमेंन या पदाच्या जागा काढण्यात आलेल्या नाही. त्यामूळे हे पदे रिक्त असून मायनिंग सरदार व ओव्हरमेंनचे महागडे शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामूळे वेकोली प्रशासनाच्या वतीने तात्काळ सदर पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीचे पत्र त्यांनी वेकोलीच्या मुख्य व्यवस्थापीक संचालक नागपूर, यांना पाठविले आहे.