Bhairav Diwase. Aug 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी- आज दि.29/08/2020 ला महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.देवरावजी भोंगळे यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात *दार उघड उद्धवा दार उघड* अशा घोषणा करीत गोंडपिपरी भाजपाचे घंटानाद आंदोलन घेण्यात आले.
कोविड 19 महामारीची परिस्थिती बघता राज्य शासनाने सर्वधर्मीयांची देवालये अर्थात मंदीर, मस्जीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला हौता.गेले सहा महिने संपूर्ण जग कोविड-19 च्या महामारीचा सामना करीत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने परिपत्रक जारी केले व देशातील सर्व धर्मीय देवालय प्रार्थनास्थळे हे खुली करण्याचे आदेश दिले परंतु महाराष्ट्र सरकारने अजूनही त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही महाराष्ट्रात शॉपिंग मॉल,मास,मदिरा विक्रेत्यांची संपूर्ण दुकाने खुली झाली मात्र लोकांच्या जनभावना लक्षात घेता महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अशा या महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे खुली व्हावे याकरिता गोंडपिपरी भाजपा व सर्व आघाडी च्या माध्यमातून घंटानाद आंदोलन घेण्यात आले.यामध्ये सर्व धर्माच्या नागरिकांचा समावेश होता. या आंदोलनाचे भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे व गोंडपिपरी भाजपा नेते निलेशजी संगमवार व कार्य अध्यक्ष साईनाथ मास्टे , चेतन गौर, राकेश पुन युवा मोर्चा जिल्हा सचिव,अश्विन कुसनाके, सुनील फुकट ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष,
गणपती चौधरी, नाना येल्लेवार, ,रमेश दिनगलवार, मारोती झाडे, मारगोनवार तथा भाजप कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.