Click Here...👇👇👇

ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट.

Bhairav Diwase
बेलगाव येथे आमदार बंटीभाऊ यांनी दिली भेट, निष्क्रिय शासनाबाबत लोकांचा केला आक्रोश शांत.
Bhairav Diwase.    Aug 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या दौऱ्यावर असतांना बेलगाव येथे भेट दिली.पुरामुळे या गावातील लोकांचे भरपूर नुकसान झाले असून याबत अजुन पर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही त्यामुळे गावांतील लोकांचा तीव्र निषेध होता आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भेट देताच तेथील नागरिकांचा आक्रोश शांत झाला. आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी गावांतील नागरिकांसाठी अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करून सहकार्य केले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

     प्रत्यक्ष पाण्यात इंजिन बोटीद्वारे पूरपरिस्थितीचे निरीक्षण करून आढावा घेतला यावेळी वसंत वारजुकर, दीपक उराडे, कृष्णा सहारे, रवी मेश्राम, आवेश पठाण, संतोष रडके, सचिन आकुलवार आदी उपस्थित होते ...