Top News

सत्ताधाऱ्यांना माजी आमदार अॅड संजयभाऊ धोटे यांच्या नावाची ऍलर्जी का?

नवीन अभ्यासिका लोकार्पण सोहळ्याला बोलवण्यास टाळले.

भाजपच्या नगरसेवकांचा कार्यक्रमाला विरोध.
Bhairav Diwase. Aug 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- कोरपना येथे विद्यार्थ्यांकरीत आधुनिक अभ्यासिका व्हावी या करिता स्टुडन्ट फोरम ग्रुप ने माजी आमदार अॅड संजयभाऊ धोटे यांच्याकडे केली होती, त्यानुसार माजी अर्थ मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व आमदार अॅड संजयभाऊ  धोटे प्रयत्नातून अत्याधुनिक अभ्यासिका बांधकाम करिता निधी उपलब्ध करून दिली व भव्य व देखणी अशी अभ्यासिका निर्माण झाली ,नुकत्याच झालेल्या विधानसभा निवळणुकीत वेळेवर आचारसंहिता लागल्याने लोकार्पण होऊ शकले नाही,परन्तु विधानसभा निवडणूक होऊन १० महिन्याचा कार्यकाळ झाला परन्तु लोकार्पण सोहळयाचा मुहूर्त मिळत नव्हता अखेर १ सप्टेंबरला लोकार्पण करण्याचे ठरविले परन्तु माजी आमदार अॅड संजयभाऊ धोटे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने नगर पंचायत मध्ये सत्तेत असणाऱ्या सत्ताधीकार्यांनी जाणीवपूर्वक बोलवण्याचे टाळले असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधीकर्यांना मा. अॅड संजयभाऊ धोटे यांच्या नावाची ऍलर्जी का असा सवाल उपस्थित झाला आहे. 
माजी आमदार अॅड संजयभाऊ यांनी कोरपना शहराच्या विकासाठी २ कोटी निधी उपलब्ध करून दिला होता तेव्हा सुद्धा भुमीपूजन कार्यक्रमाला बोलवण्यास टाळले होते, कोरपना येथे भाजप ची सत्ता नसतानी माजी आमदार संजय धोटे यांनी २ कोटी देऊन मोठेपणा दाखवला परन्तु सत्ताधीकर्यांत मोठेपणा नाही का? असा सवाल निर्माण झाला आहे,
नुकत्याच झालेल्या नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेत अभ्यासिका लोकार्पण करण्याबाबत विषय ठेवण्यात आला होता परन्तु सध्या कोरोना संकट असल्याने लोकार्पण करता येणार नाही असे मा. मुख्यधिकारी कविता गायकवाड यांनी सांगितल्याने या कार्यक्रमाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही परन्तु सत्ताधीकर्यांनी सत्तेचं दुरुपयोग घेत लोकार्पण सोहळा १ सप्टेंबर आयोजित केला आहे,परन्तु या लोकार्पण सोहळ्याला माजी आमदार अॅड संजयभाऊ धोटे याना निमंत्रित न केल्याने भाजपच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने