Top News

महाराष्ट्र सफाई कामगार संघटना अध्यक्ष रवींद्र कंडारे यांनी घेतली मा आ. नरहरी सीताराम झिरवाळ उपाध्यक्ष विधानसभा महारष्ट्र यांची भेट.

सफाई कामगार यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी ना धंनजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री यांच्याशी बैठक लावण्याबाबत‌.

मा ना नरहरी सीताराम झिरवाळ उपाध्यक्ष विधानसभा यांनी बैठक आयोजीत करण्याचे दिले आश्वासन.
Bhairav  Diwase.    Aug 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- 
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटना ISO : 9001 - 2015 राज्यातील सफाई कर्मचारी यांच्या सेवा विषयक समस्या व अडचणी सोडविण्याचे काम करता आहे, सध्या राज्यात सफाई कर्मचारी संवर्गाची एकही शासन मान्यता प्राप्त संघटना नसल्यामुळे शासन व प्रशासन दरबारी समस्या सोडविणे अत्यंत अडचणीचे ठरते, यामुळे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेस मनासे वर्तणूक नियम, 1979 कलम, 29 नुसार शासन मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव (दिनांक 15 मार्च, 2010 ) सामाजिक न्याय विभाग कडे दाखल केलेला आहे, सफाई कर्मचारी संवर्गास महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम लागू आहेत, या संघटनेस मनासे वर्तणूक नियम, 1979 कलम,29 नुसार शासन मान्यता प्रदान करण्याचा प्रश्न फाइल ई ऑफिस नंबर 350319 सामाजिक न्याय व  सामान्य प्रशासन विभाग 16 - अ या विभागाकडे प्रदीर्घ काळा पासून प्रलंबित आहे, सदर फाइल मंजूर करून संघटनेस शासन मान्यता प्रदान करण्यासाठी मा नामदार नरहरी ज़िरवाळ साहेब उपाध्यक्ष विधानसभा यांनी शिफारस करून संघटनेस मान्यता मिळण्यासाठी मागणी केलेली आहे, तरी मा ना उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व मा ना धनंजय मुंडे साहेब मंत्री महोदय राज्य शासनाने तातडीने निर्णय घेऊन कोरोना योद्धा सफाई कर्मचारी यांना सामाजिक न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली.


    मा नामदार नरहरी सिताराम झिरवाळ साहेब उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र यांच्या समवेत भेट घेऊन राज्यातील सफाई कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्या प्रश्न सोडवणूक करण्यासाठी मा नामदार धनंजयभाऊ मुंडे साहेब मंत्री सामाजिक न्याय विभाग यांच्या समवेत शासन स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल आणि प्रलंबित प्रश्न सोडवणूक करण्यात येईल असे आश्वासन दिल्याबदल सफाई कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी समवेत इंजि. जिनेंद्र कंडारे,मितेश कंडारे SI हर्षल कंडारे, ऋतिक गोयर, राज कंडारे, खुशाल कंडारे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने