Bhairav Diwase. Aug 13, 2020
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यात काल रात्री मिळालेल्या रिपोर्टमध्ये आणखी दोन व्यक्ती कोरोणा पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे गोंडपीपरी शहरातील जनतेत भीतीच वातावरण पसरलेला आहे. त्यामुळे गोंडपीपरी शहर बंद होण्याच्या मार्गावर आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील वासियांनी घरीच राहा! सुरक्षित राहा ! विनाकारण घराबाहेर पडु नका, मास्क वापर करावा, सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे.
तसेच गोंडपीपरी शहरातील पंचायत समिती व भगतसिंग वॉर्ड येथे रुग्ण सापडल्याने तो एरिया सील करण्यात आला आहे.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गोंडपिपरी शहर 14 किंवा 15 ऑगस्ट पासून बंद करण्याचे प्रशासनाकडून संकेत मिळत आहे.