Top News

विरोधकांचा राजकीय द्वेषातून बदनामीचा कारस्थान असून कोणताही गैरव्यवहार झाले नाही:- जिल्हा परिषद सदस्य वैशाली शेरकी.

अंतरगाव आरोग्यवर्धीणी येथिल प्रकार.
Bhairav Diwase. Aug 13, 2020



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र अंतरगाव येथे रुग्ण कल्याण समितीच्या खात्यातील 32000/रुपये परस्पर हडप करून गैरप्रकार केल्याचा आरोप दैनिक पुण्यनगरी वर्तमानपत्र येथील कार्यकर्त्यांनी राजकीय आकसापोटी व देश भावनेतून सामाजिक बदनामी करण्याचा प्रयत्न चालविला आहे असा आरोप करण्यात आलेल्या व्रुतांत चे खंडन रुग्णकल्याण समिती अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई शेरकी यांनी केला.
रोज च्या येणाऱ्या रुग्णाकडून opd नोंदणी शुल्क 5रुपये घेण्यात येतो त्या पाच रुपयातील 2रुपए जिल्हा परिषद ला जमा होतो .व 3रुपये हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील साहित्य खरेदी वैगरे अशा करीता स्वखर्चा करीता रुग्ण कल्याण समिती च्या खात्यात जमा ठेवली जातो .
याकरिता आरके चा खाता ओपन केला जातो. या खात्यातील निधीच्या विनियोगा करिता रुग्ण कल्याण समिति असतो यात स्थानिक जिल्हा परिषद सदस्य हे अध्यक्ष असतात व वैद्यकीय अधिकारी हे सचिव असतात. निधीचा विनियोग करण्याकरिता अंतरगाव रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत साहित्य खरेदी चा ठराव पारित झाले व आवश्यक साहित्य खरेदीकरिता साहित्य पुरवठा धारकाकडून कोटेशन मागविला गेले त्यानुसार तीन नोंदणीकृत पुरवठा धारकांनी आरोग्यवर्धिनी केंद्र अंतरगाव वैद्यकीय अधिकारी तथा रुग्ण कल्याण समितीच्या समिती कडे सादर केले त्यानुसार कमी दरात असलेल्या कोटेशन धारक मूल येथील पडगे लवार इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रिकल्स यांचे कोटेशन मंजूर करण्यात आले. त्यानुसार रिवाल्वीन्ग चेअर व साध्या चेअर्स मंजूर कोटेशन दरानुसार पुरवठा करिता आदेश देण्यात आले पुरवठा धारकांनी कोटेशन नुसार अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला वस्तूंचा पुरवठा केला व संबंधित किमतीचे बिल सादर केले सदर बिला नुसार देणे असलेल्या व्यवहार याकरिता अकाउंट पे चेकअसल्याने माझे कडे देन्यात आले .व मी अंतरगाव बँकेत वटवीत रक्कम पुरवठा धारक यांना बिला नुसार दिली व उर्वरित रक्कम खात्यात जमा केली . रुग्ण कल्याण समिती चे सबंधित सचिव तथा वैद्यकीय अधिकारी यांनी पुरवठा धारकाचे नाव चेक देणे आवश्यक असताना ते माझ्या नावे देण्यात आले परंतु याबाबतीतील नियमावली मला माहिती नसल्याची बाब लक्षात घेऊन जाणून-बुजून बदनामी करण्याकरिता सदर रकमेचे चेक परस्पर माझ्याकडे देण्यात आले आरोग्यवर्धिनी केंद्र खाते असलेल्या अंतर्गत को-ऑपरेटिव बँक शाखेत जमा करून रक्कम काढून बिला नुसार साहित्य खरेदी केलेल्या मुल येथील पुरवठादार ला दिले त्यात कोणत्याही गैरव्यवहार केलेला नाही मी जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आले व नियमानुसार रुग्ण कल्याण समितीचे तीन वर्षापासून अध्यक्ष पद भूषविले तेव्हापासून या आरोग्यवर्धिनी केंद्रातील व्यवस्थापनात कधीही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप व आर्थिक गैरप्रकार केल्याचा प्रकार माझ्याकडून घडलेला नाही परंतु काही राजकीय विरोधकांनी हेतुपुरस्कर माझी सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा मलिन करण्याकरिता शुद्ध हेतूने अनेक गावातील लोकांना नशापाणी पाजून भडकवूण मला बदनाम करण्याचा राजकीयडाव रचून प्रयत्न करीत आहे .माझ्या तीन वर्षाच्या कार्यकाळातील आतापर्यंतच्या रुग्ण कल्याण समितीच्या सचिवाकडून मला डावलून आरोग्यवर्धिनी केंद्र करिता आलेल्या निधीचा विनियोग केला परंतु यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती विरोधकांनी मागितली नाही किंवा हस्तक्षेपही सुद्धा केलेलं नाही परंतु व्यवस्थापनातील एकाच बाबीकडे लक्ष केंद्रित करून माझी सामाजिक बदनामी होईल अशी माहिती घेऊन मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न चालविला आहे यामध्ये या आरोग्यवर्धिनी केंद्राचा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरज मस्के यांना यामध्ये सहभागी करून त्याना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत चक्क लोकप्रतिनिधी ची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर जिल्हा परिषद चंद्रपूर कडे करून घेण्यात आली लोकप्रतिनिधी तक्रार करणारा प्रथमच वैद्यकीय अधिकारी असल्याचीही चर्चा परिसरात होत आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यानि संगणमत करून राजकीय रंग लावला आहे अशी चर्चा अंतरगाव परिसरात होत आहे . शासनाकडून निकष व नियमानुसार मिळणारे अनुदान या आरोग्य केंद्रात पाहिजे त्याप्रमाणे मिळत नाहीत व प्रशासनाकचे वाभाडे काढणारा आरोग्य केंद्राला मी स्वतःचे पैसे लावून सु व्यवस्थित केल्याचा आव आणून राजकीय वलय असलेला हा वैद्यकीय अधिकारी स्वतःची प्रसिद्धी वर्तमानपत्रातून करणाऱ्या केली विद्यमान वैद्यकीय अधिकारी तथा सचिव रुग्ण कल्याण समिती डॉक्टर सुरज मस्के यांनी यांना हाताशी धरून माझ्यासारख्या महिला सदस्याला द्वेष भावनेतून राजकीय व सामाजिक हानी पोहोचेल व मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा कट कारस्थान निमगाव येथील भाजपा कार्यकर्ता पुनम झाडे यांनी वर्तमानपत्रातून व सोशल मिडीयाद्वारे चालविला आहे सदर प्रकरणात महिला प्रतिनिधी चा अवमान करणारा हा प्रकार घडवीत असून डॉक्टर ला हाताशी घेवून काही विरोधी पक्षांच्या लोकांनी कट केलेला आहे मात्र या अंतर्गत कोणत्याही प्रकारचा गैर प्रकार व आर्थीक व्यवहार झालेला नसून उचल केलेल्या रकमेची सर्व साहित्य व उरलेले पैशाची रक्कम रुग्ण कल्याण समितीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीमध्ये सदर वस्तू खर्च करण्याची मंजुरी ठराव घेऊन सर्वानुमते करण्यात आली होती संबंधित विरोधकांनी केलेल्या तक्रारीनुसार 32 हजार रुपयांची उचल केलेली होती परंतु ते खरेदी केलेल्या वस्तूचा पूर्ण पेमेंट करूनउर्वरित रक्कम खात्यात आहे त्याची बिले कोटेशन सादर करण्यात आली व उर्वरित रक्कम रुग्ण कल्याण समितीच्या खात्यात टाकण्यात आली त्यामुळे राजकीय पदाधिकार्‍यांना घेऊन तक्रार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व राजकीय व्यक्तींनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून संपूर्ण चौकशीसाठी तत्पर आहे व माझे वर कोणत्याही प्रकारचा गुन्हा आढळून न आल्यास माझे बदनाम करणाऱ्यावर मी कारवाई करेन.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने