Bhairav Diwase. Aug 13, 2020
चंद्रपूर:- नवे जिल्हाधिकारी यांचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी त्यांची भेट घेतली. आरोग्य यंत्रणेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यामध्ये चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता देखील होते. त्यांना काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे होती. मंगळवारी त्यांची अँटीजेन चाचणी केल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.
चंद्रपूर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, त्यांच्या संपर्कात आल्याने जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी यांच्यासह संपूर्ण आरोग्य यंत्रणाच क्वारंटाइन झाली आहे. तसेच हे अधिष्ठाता नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या देखील संपर्कात आले. पहिल्या दिवशी त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन स्वागत केले होते. मात्र, जिल्हाधिकारी यांना क्वारंटाइनमधून सूट मिळाली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत