Bhairav Diwase. Aug 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका युवा पत्रकार राकेश चरणदास घोटेकार यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टी NSP (U) संलग्न माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांची सावली तालुका उपाध्यक्ष पदी आज दि.28/08/2020 रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थापक अध्यक्ष मा. अभिजीत आपटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. दिपक कांबळे यांच्यासह, राष्ट्रीय महासचिव मा. गोविंद भावे, समस्त विभाग आघाड्यांचे मार्गदर्शक मा. प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनार्थ, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा. कमलेश शेवाळे यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या सोबत अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत आज मा.राकेश घोटेकार यांची सावली तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचार, पत्रकारांवर होणारे हल्ले असतील, बोकाळलेले अवैध धंदे, गोरगरीबांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे.
संस्थापक अध्यक्ष मा. अभिजीत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी समाजाच्या हितासाठी, भारतीय संविधानाला अभिप्रेत शास्वत विकासासाठी, सामाजिक न्याय हक्कांसाठी, संरक्षणासाठी, प्रशासकीय बेजबाबदारपणा असेल, अन्यायाच्या विरूद्ध वाचा फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही संघटना संपूर्ण देशभरात काम करत आहेत.
या नियुक्ती बद्दल राकेश घोटेकार यांना समस्त सावली तालुका ग्रामस्थांकडून तसेच मित्र आणि नातेवाईक परिवारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.