पशुसंवर्धन विभाग व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने फुटाना मो. येथे पशुचे आरोग्य शिबिर आयोजित.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Aug 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- घोसरी- चिंतलधाबा प्रभागातील नवेगाव मोरे येथील पशु वैद्यकीय दवाखान्या अंतर्गत येणारे फुटाना मो. हे गाव. सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत तसेच सततच्या उष्ण दमट वातावरना मुड़े पशुच्या गोठाघरात डास, चावणाऱ्या माशा, गोचिड, पिसवा, यांची उत्पती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या जीवजंतुचा प्रादुर्भाव वाढूंन बैल, गाय, यांचे शरीरावर गाठी येणे, मागिल किवा पुढिल् पाय सुजने ही लक्षणे दिस्तात त्याला जुने लोक महांडोर आजर झाला असे म्हन्तात परंतु त्या आजारास पशु वैद्यकीय भाषेत लंप्पी स्किन असे नाव आहे. सद्या संपूर्ण महाराष्ट्रात या आजाराने थैमान घातले आहे. अशा बिकट परिस्थितित पशु संवेर्धन विभागाकडे मनुष्यबल कमी असल्या कारणाने त्यांची खुप तारांबळ उड़त आहे की प्रत्येक गावात कमी वेडेत पशुचे आरोग्य शिबिर कसे घ्यावे अशा परिस्थितित उमेद अभियानातील गाव स्तरावरील पशुसखी,पशु व्यवस्थापक यांच्या मदतीने गावा- गावात लम्पि स्किन चे शिबिर घेतले व शेडीला घटसर्प ची लस लावन्यात आली. सदर कैंप ला पशुधन पर्यवेक्षक लाडे साहेब, पशु व्यवस्थापक महोरकर व पशु सखी नागापुरे उपस्थित होते.