सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात 97 नविन कोरोना बाधितांची नोंद

Bhairav Diwase
⭕24 तासात 97 बाधितांची नोंद ; एका बाधिताचा मृत्यू.

⭕बाधितांची संख्या पोहोचली 1896 वर

⭕चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1117 कोरोनातून बरे.

 ⭕उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 756

Bhairav Diwase.    Aug 28, 2020



(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- जिल्ह्यात कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील 60 वर्षीय पुरुष कोरोना बाधितांचा मृत्यू दि.27ऑगस्ट रोजी सायंकाळी मृत्यू झाला.श्वसनाचा आजार असल्यामुळे बाधिताला 27 ऑगस्टला शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आज दि.28ऑगस्ट सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात 97 नविन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर 40, ब्रह्मपुरी 4, भद्रावती 5, राजुरा 7, सावली व चिमूर येथील प्रत्येकी एक, गोंडपिपरी 3, मुल 9, बल्लारपूर 12, पोंभुर्णा 2, कोरपना 7, वरोरा 3, उत्तर प्रदेश येथून आलेला एक तर वणी यवतमाळ येथील दोन बाधिताचा समावेश असून  एकूण 97 बाधित पुढे आले आहेत.