Top News

गडचांदूर नगर परिषद च्या नगराध्यक्षांचा प्रताप.

विषय सूचित नसताना वा सभेत चर्चा न होताच दाखविला मंजूर ठराव.

भाजप नगरसेवकांनी ठराव रद्द करण्याची मागणी भाजपा चे नगरसेवक डोहे व मोरे यांनी मा जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कडे केली.
Bhairav Diwase. Aug 16, 2020
(भाजपचे नगरसेवक)


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर शहराची दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक पार पडली व थेट कांग्रेसच्या नगराध्यक्षा सौ सविताताई टेकाम यांना जनतेनी निवडून दिले.आणि कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस चे नगरसेवक बहुमताने निवडून आल्याने राष्ट्रवादी कांग्रेसचे श्री शरद जोगी उपाध्यक्ष पदी विरंजमान झाले.शिवसेना ६ तर बीजेपी चे २ नगरसेवक हे विरोधी बाकावर आहे असे असताना नगराधक्ष्य यांनी सर्वसाधरण सभा दि.१६/३/२०२० ला ५१ विषयावर पार पाडली बहुतांश ठराव मंजूर सुद्धा करण्यात आले.कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने पुढे चार महिने सभा घेण्यात आली नाही.परन्तु विरोधी नगर सेवकांना डावलून सत्ताधारी यांनी मे महिन्यात गुप्त मिटिंग घेऊन सत्ताधारी नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील बोअरवेल मारण्याबाबतचे पत्र घेऊन मागील सभेतच मंजूर दाखविले.ही कल्पना विरोधी भाजपा नगरसेवकाला कळताच नगरसेवक अरविंद डोहे यांनी नगर परिषदला माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून ठरावाची सत्यप्रत,सभेची अडिओ/व्हिडीओ क्लिप,व सन्माननीय नगरसेवकांनी मागणी केलेले पत्राची मागणी केली असता सभेची अडिओ/व्हिडीओ क्लिप न देता बाकी माहिती दिली तेव्हा नगराध्यक्षाचा प्रताप लक्ष्यात आला की,सभा मार्च महिन्यात व नगरसेवकांची बोअरवेल मारण्याची मागणी मे महिन्याची,त्यांनी नगर परिषद कडून
मिळालेली माहिती पहले असता त्यातील विषय क्र ११ ,१३ व ५१ ह्या ठरावात घेण्यात आलेले काम हे विषय सूचित नसताना वा सभेत चर्चा न होता निव्वळ पदाचा गैरवापर करून विरोधी नगरसेवकाला डावलुन लिहिण्यात आला असल्याने सदरचे ठराव हे खोटा,बनावट, नियमबाह्य,बेकार्यदेशीर असल्याने रद्द करण्या बाबत मा जिल्हा प्रशासन नगर परिषद विभाग जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कडे अपील केली असून सदर अपिलचा निकाल लागेपर्यंत त्या ठरावाची अमलबजावणी करू नये वा कुठलाही निधी खर्च करू नये अश्या आशयाचे निवेदन मा.मुख्याधिकारी यांना देऊन विनंती केली असून आता त्यावर काय निर्णय घेतील याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने