Top News

“जागर अस्मितेचा” मोहिमेचा थाटात शुभारंभ.

“जागर अस्मितेचा” मोहिमेचा थाटात शुभारंभ.
Bhairav Diwase. Aug 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- उमेद- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं. स.पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर अंतर्गत “जागर अस्मितेचा” मोहिमेचा शुभारंभ आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या सभागृहात पार पाडण्यात आला. जागर अस्मितेचा याचाच अर्थ जागर स्त्रीत्वाचा.. उमेद अभियान महिला सबलीकरण व शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करते त्यामुळे स्त्री व तिच्या कुटुंबातील मुलींचे आरोग्य चांगले राहावेत तसेच ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीच्या काळात उदभवणाऱ्या समस्या व त्यावर उपाययोजना बाबत उमेद अभियानामार्फत मार्गदर्शन करण्यात येते. त्याशिवाय “त्या पाच दिवसातील आरोग्य” चांगले राहावेत त्यासाठी अभियाना मार्फत माफक दरात सॅनिटरी प्याडची समूहामार्फत विक्री करण्यात येते. या सॅनिटरी प्याड वापरण्याबाबत अधिक जनजागृती व्हावी तसेच स्वयंसहाय्यता समूहामार्फत सॅनिटरी प्याडची विक्री करून त्यांना रोजगाराचे एक साधन मिळवून देणे या करिता नव्याने दिनांक 15 ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंत या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे. सदर मोहिमेचे शुभारंभ मा. डॉ. खटके सर तहसीलदार पोंभुर्णा, मा. ठाणेदार साहेब, मा.कु.अल्काताई आत्राम सभापती पं. स.पोंभुर्णा मा.श्री. कवडुजी कुंदावार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा, मा.श्री.विनोदभाऊ देशमुख सदस्य पं.स.पोंभुर्णा, मा.श्री.धनंजय साळवे गट विकास अधिकारी, मा. श्री.मेरगड सर CDPO ,मा.श्री.मडावी सर गट शिक्षणाधिकारी ,तसेच श्री. राजेश दुधे तालुका अभियान व्यवस्थापक उमेद यांच्या हस्ते करण्यात आले.
जागर अस्मितेचा मोहिमेचा उद्देश नेमका काय आहे या बाबत सविस्तर माहिती श्री राजेश दुधे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना समजावून सांगितले. तसेच अस्मिता प्लस सॅनिटरी प्याड चे वाटप सुद्धा मान्यवरांच्या हस्ते महिलांना करण्यात आले. सदर कार्यक्रमास संपूर्ण उमेद टीम उपस्थित होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने