Bhairav Diwase. Aug 22, 2020
पोंभुर्णा:- देशावर कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवत असतांना अशा वेळेस निदानाचे सर्वोत्तपरी प्रयत्न केले जात आहे आहेत. अशा कठीण परिस्थितीत कोविड-१९ या लढ्यात १०८ अँबुलन्सचे वाहन चालक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोना महामारीच्या काळात वाहन चालकांचा सिहांचा वाटा असून या काळामध्ये कठीण प्रसंगात ते जबाबदारी ने अतुलनीय सेवाकार्य करीत आहेत. त्याबद्दल १०८ अँबुलन्स वर कार्यरत असलेले वाहन चालक श्री. अनुराग जुवारे, श्री.सचिन दुमेवार, श्री.उमेश गोलगोंडावार, सचिन चलकलवार यांचा तालुका आरोग्य समितीच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित तालुका आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. राहुल संतोषवार सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर, पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती कु.अल्का आत्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, डॉ. गोजे साहेब, श्री.प्रवीण चीचघरे, श्री. रवी गेडाम इ.उपस्थित होते.