Top News

बल्लारपूर शहरात एकाची गळफास घेऊन आत्महत्या तर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला.

Bhairav Diwase.   Aug 03, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील शिवनगर वार्ड परिसरातील तीन एक्का गेट समोरील परिसरात राहत असलेल्या मृतक नामे सुरेश पन्नालाल बेनी, वय - ३२ वर्ष, हे २ ऑगस्ट २०२० च्या रात्री आपल्या स्वतःचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

 सकाळी उठल्यावर घरच्यांनी पाहिले असता सुरेश गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला घरच्यांनी लगेच याबतची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी सदर व्यक्तीला फासावरून उतरवून ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे शवविच्छेदन करण्याकरिता पाठविले, सुरेश सद्यस्थितीत पेंटींगचे काम करीत होता मात्र काम मिळत नसल्याने नैराश्याने ग्रस्त होता याशिवाय त्याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी जाऊन होती त्यामुळे तो तणावात असल्याचीही माहिती आहे याबाबत चा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.   
   तसेच दुसऱ्या एका घटनेत बल्लारपूर शहरातील कोतपल्लीवर पेट्रोल पम्प समोरील गायत्री मंगल कार्यालयाच्या बाजूला दादाभाई नवरोजी वार्डात एका अनोळखी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला सदर मृतदेह 2 ऑगस्टला सायंकाळी 5:00 वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे याबाबतची माहिती बल्लारपूर पोलिसांना कळविली असता पोलिसांनी रुग्णवाहिका पाठवून तपासणी केली असता  तो मृत अवस्थेत आढळून आला त्याच्या जवळ एक थैली सापडली असून त्यात काही सामान ही होते सदर व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ठेवला असून या व्यक्तीबद्दल काही माहिती आढळल्यास पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे सम्पर्क साधावा तसेच सदर व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती शवविच्छेदन अहवालानुसार कळेल.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने