Click Here...👇👇👇

ओंकार बाल गणेश मंडळ राजुरा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न.

Bhairav Diwase
1 minute read
Bhairav Diwase. Aug 30, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा येथील ओंकार बाल गणेश मंडळ तर्फे कर्नल चौक येथील गणेश मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात कोरोना संकटात देखील 30 राक्तदात्यांनी रक्तदान केले. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. शिबीराचे उदघाटन स्थानिक सचिन भोयर यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री डोमेश्वर बोंडे , श्री मसादे होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मयूर झाडे , प्रणव मासादे , माही वडस्कर , स्वप्नील रासेकर , आदित्य धोटे , पराग हिंगाने , अंकुश कायरकर , रुपेंद्र ढवस, तथा मंडळातील सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
कोरोना संकटकाळात शासनाने गणेशोत्सव वर नियम व अटी घालून मंडळांना आधीच सूचना दिल्या होत्या त्यात सांस्कृतिक कार्यक्रमाना बंदी होती मात्र रक्तदान शिबिर , आरोग्य शिबीर या सारखे कार्यक्रम घेण्यास शासनाची परवानगी आहे या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.