जनावरांना चौखुरा रोगाची लागण.
Bhairav Diwase. Aug 16, 2020
चिमूर:- चिमुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनावरांना चौखुरा रोगाची लागण झाली असून इतरही गावांमध्ये साथ पसरत आहे. याची दखल घेऊन सदर गावामध्ये शिबिर आयोजित करून सर्व जनावरांचे तात्काळ लसीकरण करण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यांनी पशुधन विकास अधिकारी यांना दिल्या.*
आज दि 16 आगस्ट रोजी खासदार अशोक नेते हे चिमुर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना चिमूर तालुक्यातील
१) मदनापूर २) कोलारा ३) करबडा ४) मुरपार ५) मिनझरी ६) बोथली ७) खुटाळा ८) मोटेगांव ९) नवतळा १०) खडसंगी ११) महादवाडी १२) लोहारा
१३) आमडी इत्यादी *गावात जनावरांना चौखुरा रोगाची झाली असल्याची माहिती मिळताच खास नेते यांनी पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून जनावरांच्या रोगाबाबत माहिती जाणून घेतली व सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता सदर गावामध्ये शिबीर घेऊन त्वरीत जनावरांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले.*
*तसेच चिमूर तालुक्यातील भिसी सावरी, चिचाळा गडपिपरी, डोमा खापरी, कन्हाळगांव महालगांव व कवडशी देश या गावामध्येही लसीकरण शिबीर लावण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यांनी यावेळी केल्या असता अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात सर्व गावांमध्ये शिबीर लावून लसीकरण करणार असल्याचे सांगितले.*