Bhairav Diwase. Aug 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यातील हिरापूर येथे दिनांक 11 ऑगस्ट 2020 ला एकूण 6 कोरोना रुग्ण सापडले होते आणि संपूर्ण हिरापूर गाव सीलबंद करण्यात आले होते. जनजीवन विस्कळीत झाले होते.
राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व या क्षेत्राचे आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांना सदर घटनेची माहिती होताच विजय भाऊंनी पाऊले उचलून हिरापूर या गावाला मास्क, सॅनिटॉयझर, व होमोपॅथिक औषधे उपलब्ध करुन दिली.
आ. विजय भाऊ वडेट्टीवार हे संकट काळात अनेकदा मदत करतात हा इतिहास आहे. एक जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा याची प्रचिती हिरापूर गावाला आली.
होमोपॅथीक औषधे नागपूर येथून बोलविण्यात आली. सदर साहित्याचे वाटप तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बंडू बोरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नितीन गोहणे, गावचे सरपंच बंडू मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य अतुल कोडापे, मालडोंगरी तालुका ब्रम्हपुरी येथील सरपंच जयपाल पारधी, विजय वडेट्टीवार यांचे सिनियर सहायक सुधीर पंदिलवार, संजय सायंत्रावार, उपस्थित होते.