Bhairav Diwase. Aug 02, 2020
कोरपना:- माणिकगड सिमेंट कंपनी च्या माईंनस जवळ असलेल्या नाल्या मध्ये मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेल्या 18 वर्षे वय असलेला विध्यार्थी स्वाभिक रामेश्वर प्रसाद याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी 1 च्या दरम्यान घडली, गडचांदूर येथील वार्ड न,5 मध्ये राहणारा हा विद्यार्थी मित्रांसोबत गोवारीगुडा जवळ असलेल्या माणिकगड कंपनी च्या खदानी जवळ असलेल्या नाल्या मध्ये आंघोळ करण्यास उतरल्यावर तो पाण्यात बुडाला, मित्रांनी माहिती पोलिसांना दिली,पोलिसांनी प्रेत डोहाबाहेर काढून पंचनामा केला,पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहेत,सध्या सर्वत्र पाऊस झाल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत,तेव्हा,नागरिकांनी, विद्यार्थ्यांनि नदी,नाल्या मध्ये उतरू नये असे आवाहन पोलिस प्रशासन तर्फे करण्यात आले आहेत.