वाघाचे नख विक्रीकरिता ग्राहक शोधणारे पोलिसांच्या ताब्यात.

Bhairav Diwase.    Aug 02, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
भद्रावती:- शहरातील गुरु नगर परिसरात वाघाचे नख विक्रीकरिता आणण्यात आले असून ते विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे सापळा रचून दोन आरोपी सह एक वाघ नख ताब्यात घेतले ही कारवाई शनिवारला करण्यात आली. यातील प्रशांत बालाजी बावणे वय 26 वर्ष राहणार मुधोली, विकास ऋषी बावणे वय 22 वर्ष राहणार गुरुनगर असे आरोपीचे नावे असून हे शनिवारला शहरातील गुरु नगर परिसरात वाघाचे नख विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून एक वाघ नखा सह दोन आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, सचिन गुरनुले, हेमराज प्रधान, केशव चिटगिरे, निकेश ढेंगे यांनी केली हे प्रकरण वन विभागाशी संलग्न असल्याने त्या आरोपींना वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. स्वाती म्हैसकर वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती वाघ नखासह दोन आरोपींना वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आली असून सदर प्रकरण हे गेल्या काही दिवसापूर्वी ताडोबा बफर झोन येथील प्रकरणातील वाघाच्या मिशा व वाघ नखा सह काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते त्यातीलच हे अन्य आरोपी असून पुढील तपास करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत