Top News

वैनगंगा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान.

वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे हजारो एकर जमिन पाण्याखाली.
Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली-जीबगाव-हरांबा मार्गापर्यंत नदीच्या पुराचे पाणी आल्याने आजूबाजूच्या शेतातील खूप मोठे नुकसान झाले आहे. गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ ही शेतकऱ्यांना घातक ठरली आहे. नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढली की त्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये भरपूर पाणी साचले आहे. या आलेल्या पुराची माहिती प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांनी नायब तहसीलदार यांना दिली व प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई देण्याविषयी संवाद साधला. तर सावली चे नायब तहसीलदार कांबळे साहेब हे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार आहोत असे सांगितले. तसेच सावली कडे जाणार मार्ग पुरामुळे पूर्णपणे बंद झालेला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने