Bhairav Diwase. Aug 24, 2020
राजुरा:- कोरोणा महामारीच्या जागतिक संकटाला तोंड देत असतांना योद्धे बनून राष्ट्रीय सेवा बजावणार्या कोरोना योद्धा, 108 रुग्ण वाहिकेचे कर्तव्यदक्ष चालक ( पॉयलट) श्री. खुशालजी लडके यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा तथा युवा मोर्चा विद्यार्थी आधाडी तर्फे त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून 23 आॅगस्ट रोज रविवारला त्यांना PPE किट देऊन सन्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ डोहे, भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार, विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष राहुल थोरात, तालुका महामंत्री छबिलाल नाईक, शहर अध्यक्ष सुधीर अरकिलवार, युवा नेते श्रीराम जाधव, अजयकुमार श्रीकोंडा, हरीश ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.