नवपिढीतील विद्यार्थ्यांना चिमूर क्रांतीच्या इतिहासाची आठवण होणे काळाची गरज:- आ.बंटीभाऊ भांगडीया.

Bhairav Diwase
शहीद दीना निमित्त चिमूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मा.गृहराज्यमंत्री हंसराजभैया अहिर व खासदार अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती.
Bhairav Diwase. Aug 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर क्रांतिभूमी च्या स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली चिमूर येथे इंग्रज सरकार च्या विरोधात आंदोलन करण्यात आली.देशात सर्वांत आधी स्वातंत्र्य मिळाले असेल तर ते चिमूर ला या या क्रांतिभूमी साठी बालाजी रायपूरकर शाहिद झाले अनेक हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेली ही क्रांतिभूमी आहे.या भूमीचा इतिहास नव पिढीतील युवकांना विद्यार्थ्यांना नेहमी आठवणीत राहावा यासाठी १६, ऑगस्ट या दिवशी शहीद दिनाच्या निमित्ताने चिमूर तालुक्यातील १० वि व १२ व्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्या जातो.असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांनी केले.


चिमूर क्रांतिभूमीच्या नावावर अनेक राजकारण्यांनी आपली पोळी शेकून घेतली परंतु चिमूर ला जिल्हा बनवू शकले नाही भारतीय जनता पार्टीच्या काळात मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या काळात चिमूर ला अप्पर जिल्हाधिकारी कार्यकाय मंजूर झाले चिमूर क्रांति भूमीचा सेवक या नाते या क्रांती भूमीसाठी या भूमीला जिल्ह्याचा दर्जा देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील असल्याचा विश्वास देखील त्यांनी दिला.या भूमीत हुतात्म्यांच्या नावावर राजकारण करत खोट बोलून सत्ता भोगणाऱ्यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा अधिकार सुद्धा नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमात ज्यांनी अयोध्या राम मंदिर साठी आंदोलन केली अनेक कार सेवक चिमूर विधानसभा क्षेत्रांतून अयोध्या येथे गेले त्यांच्या मागणीला आज यश प्राप्त झाल्याने आज त्यांचा सत्कार करण्यात आला.शहिद दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.१० वि व१२ व्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कोरोना काळात रक्त साठ्याची आवश्यकता लक्षात घेता भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमा दरम्यान अध्यक्ष म्हणून लाभलेले माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैया अहिर व खासदार अशोक नेते यांचा सत्कार करण्यात आला हंसराजजी अहिर व खासदार अशोकनेते यांनी मौलिक मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला भाजपा जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूकर,चंद्रपूर जिल्हापरिषद उपाध्यक्षा सौ.रेखाताई कारेकार,बांधकाम सभापती राजु गायकवाड,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामजी हातवादे,निलमजी राचलवार, राजुजी देवतळे,बकारामजी मालोदे,भाजपा जेष्ठ नेत्या सुमनताई पिंपळापुरे,विवेक कापसे उपस्थित होते सोशल डिस्टनस चे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रम पार पाडण्यात आला.