Top News

पोळा सणावर यंदा कोरोना मुळे विरजण.

तान्हा पोळ्यालाही ब्रेक.

पोळा सणाचे असे आहे नियम.
Bhairav Diwase. Aug 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोरोना संसर्गाच्या भीतीने यावर्षी अनेक सण-उत्सवांवर बंधने आली आहे. शेतकऱ्यांचा सण असलेला पोळाही यावर्षी कुठेच भरविता येणार नाही. त्याऐवजी शेतकरी, नागरिकांना घरी राहूनच बैलांची पूजा करावी लागणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी एक पत्र काढले आहे.


कष्टकऱ्यांच्या श्रमाप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा केला जातो. कृषी संस्कृतीमधील सर्वात मोठा उत्सव मानला जाणाºया पोळा उत्सावाच्या सार्वजनिक स्वरुपावर बंदी घालण्यात आली आहे. वैयक्तिक स्वरुपात बैलांना सजविता येणार असून केवळ घरीच पूजा करता येणार आहे. यामुळे पोळा उत्सवाला यावर्षी मुकावे लागणार आहे.

दरम्यान, सोशल डिस्टन्स ठेवून बैलांची पूजा करावी लागणार आहे.


तान्हा पोळ्यालाही ब्रेक.

कोरोनामुळे सावधगीरी म्हणून यावर्षी तान्हा पोळा सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यावर ब्रेक लावण्यात आला आहे. यामुळे दरवर्षी तान्हा पोळ्यात बैलासह स्वत:ही सजूनधजून तयार होऊन येणाºया चिमुकल्यांच्या उत्सवावरही विरजन पडणार आहे.




असे आहे नियम.

- पोळा सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास निर्बंध

- बैल पोळा भरण्यात येऊ नये, बैलांची पुजा व अन्य धार्मिक कार्यक्रम घरीच साजरे करावे

- पोळा व तान्हा पोळ्यानिमित्त होणाऱ्या बैल सजावट स्पर्धा, मिरवणूका, शोभायात्रा यावर निर्बंध

- धार्मिक विधी असल्यास जास्तीत जास्त पाच जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम करावा लागणार आहे.

- सांस्कृतिकऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावे.

- पोळा साजरा करताना बैलांच्या मिरवणूक काढण्यात येऊ नये

- बैलांची पूजा करताना मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने