दारू विक्रेत्यांविरुध्द सावली पोलीसांची धडक कारवाई, दारू सह पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Bhairav Diwase

दारु विक्रेत्या विरुद्ध पोलीस विभागाची कारवाई धडकली.

हरणघाट नाक्यावर दारू सह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त. सणासुदीच्या काळात दारू विक्रेत्यांवर आली मोरघाड…
Bhairav Diwase. Aug 23, 2020



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-
सणासुदीच्या काळात दारू विक्रीला उधाण येतं असते जिल्ह्यात दारूबंदी होऊन चाडे चार वर्षाचा कालावधी लोटला असला तरी मोठ्या प्रमाणावर दार विक्रीचा महापुर सुरू आहे, नुकताच सणासुदीच्या काळाला सुरुवात झाली असताना हरणघाट नाका(चंद्रपूर गडचिरोली सिमा नाका) वर मुखबीर च्या माहीतीनुसार नाके बंद करत असताना सावली पोलीसांनी बेलोरा गाडीसह लक्षावधी रुपयांची कारवाई केली यात बेलोरो पिक अप चार चाकी वाहन क्र एम एच४९, ए.टी.१५१२ वाहनात एकुण ७० नग खाकी खरड्याच्या खोक्यात प्रत्येकी १०० नग प्रमाणे सात हजार नग ९० एम एल देशी दारू ने भरलेल्या सुपर सानिक राकेट संत्रा कंपनी सिलबंद निपा कि.७लाख, चारचाकी वाहन क्र १५१२ की. ८ लाख ,एख रेडमी कंपनी चा अनराईड मो.१० हजार असा एकूण १५,१०,००० रुपये किंमतीचा माल ताब्यात घेतला मात्र सदरच्या घडामोडीत वाहन चालक घटना स्थळावरुन पसार झाल्याने वाहनचालका विरुद्ध अ.प .क्र.१९०/०२०, कलर ६५(ई),८३, महाराष्ट्र दारुबंदी कायदा ,सहकलम १८८, भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई सहा.पोलीस अधिक्षक अनुज तारे उपविभाग मुल, तसेच सहायक पो.नी कुमार सिंग राठोड,यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा चंद्रकांत कन्नाके, पो.शी.सुमित मेश्राम, दिपक डोंगरे, नपोशी प्रिती अलाम यांनी केली आहे ,पुढिल तपास सुरू आहे.
सणासुदीच्या काळात अवैध दारू विक्रेत्यांविरुध्द पोलिसांनी कारवाई चा सपाटा सुरू केल्याने सणासुदीच्या काळात अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे….