Click Here...👇👇👇

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदलीने नागरिकांत संताप: डॉ.मस्के यांना पुन्हा रुजू करण्याची मागणी.

Bhairav Diwase
डॉ. सुरज म्हस्के यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी संपूर्ण अंतरगाव परिसरातील जनता एकवटली.
Bhairav Diwase. Aug 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील आरोग्य वर्धिनी केंद्र अंतरगाव येथे बऱ्याच वर्षानी MBBS डॉ. सुरज म्हस्के वैद्यकीय अधिकारी लाभल्याने अंतरगाव आरोग्य केंद्रार्गंत येणाऱ्या परिसरातील जनतेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कर्त्यव्य दक्ष अधिकारी असतांना एकाएकी प्रतिनियुक्ती झाल्याने अंतरगाव परिसरातील ग्रामीण जनतेवर एक प्रकारे अन्याय झाल्याने अंतरगाव परिसरातील जनतेत डॉ. सुरज म्हस्के यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी संपूर्ण अंतरगाव परिसरातील जनता एकवटल्याची दिसते आहे.
सध्या देशात चाललेल्या कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये सावली तालुक्यातील अंतरगाव आरोग्य वर्धिनी केंद्रात एक अनुभवी आणि कार्यतत्पर डॉ. सुरज म्हस्के वैद्यकीय अधिकारी यांनी अतिशय चांगल्याप्रकारे अशा कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीत आपल्या जिवाची पर्वा न करता आपली संपूर्ण अनुभवाची ताकद लावून रांत्रदिवस रुग्णाच्या उपचारासाठी बाजी लावून संपूर्ण अंतरगाव परिसरातील जनतेचे मन जिंकल्याने अशा तडकाफडकी प्रतिनियुक्ती झाल्याने परिसरातील ग्रामीण जनतेत नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसाअगोदरच अंतरावर रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षांनी स्वतःच्या नावे ३२,००० रुपये उचल केल्याने गावातील नागरिकांनी उचल केलेल्या पैशाच्या चौकशीची मागणी केली होती. आणि अशा परिस्थितीत डॉ. सुरज म्हस्के सारखे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती होण्यामुळे एकंदरीत परिस्थिती बघता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याने अंतरगाव परिसरातील गावकऱ्यांनी आज सावली तालुक्याचे तहसीलदार यांना प्रतिनियुक्ती रद्य करण्यात यावी या करिता संपूर्ण अंतरावर आरोग्य वर्धिनी केंद्रार्गंत गावकऱ्यांनी निवेदन दिले. परीसरातील ९ सरंपचानी पन निवेदन दिले व अतरंगाव आरोग्य वर्धिनी मध्ये एकुण २३ गावे येतात ते संपुर्ण गावातुन निवेदन जिल्हा अधिकारी तहसिलदार मार्फत देणार आहे. आता तिथे डॉक्टर नाही जर परत दिले नाही तर सर्वपक्षीय जनता आदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.