आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची संकल्पना.
जनसेवेसाठी कार्यालय गरजेचे:- भाजपा जिल्हाध्यक्ष (महानगर) डॉ.मंगेश गुलवाडे.
Bhairav Diwase. Aug 10, 2020
चंद्रपूर:- कोरोनाच्या संकटात जनतेला मदतीचा हात मिळणे अत्यावश्यक आहे.अनेक समस्यांना नागरिक सामोरे जात आहेत.अश्यात भाजपा नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा म्हणून जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याचे निर्देश आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले.हे कार्यालय जनसेवेचं उत्तम माध्यम ठरेल असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष (महानगर) डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.
ते आज सोमवार (१० ऑगस्ट) ला प्रभाग क्र.१ च्या भाजपा नगरसेविका शिला चव्हान यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करताना बोलत होते. यावेळी भाजप नेते प्रकाश धारने, ऍड. सुरेश तालेवार, नगरसेविका शिलाताई चव्हाण, नगरसेविका मायाताई उईके, नगरसेवक सुभाषभाऊ कासनगोट्टूवार,भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, मंडळ अध्यक्ष प्रमोद शास्त्रकार,युवा कार्यकर्ते गजुभाऊ भोयर, आमीनभाई शेख, लक्ष्मण पतरंगे, बंटीभाऊ धात्रक, रामकुमार अक्कपेल्लीवार, पवन ढवळे, प्रभाताई गूळधे, सुमन कोसे, सिंधू चौधरी, उषा स्वास्तिकर, लेनगुरे काकू,सहारे भाऊ, रामणारायन रविदास, दीपक मेश्राम आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.