Top News

पाचव्या दिवशीही आंदोलक चिमणीवरच.

कालच्या 5 तासाच्या चर्चेतही फुटली नाही कोंडी.
Bhairav Diwase. Aug 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि केंद्राचे स्थानिक प्रशासन ह्यांच्यात काल जवळपास 5 तास चर्चा झाली असुन अजुनही कुठलाही निर्णय घेतल्या गेला नसल्याने आंदोलक व प्रशासन ह्यांच्यातील कोंडी फुटलेली नाही. प्रकल्पग्रस्तांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या भूमिकेवरून दिसत असुन प्रशासनही माघार घ्यायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान मागील 5 दिवसापासुन बॉयलरच्या चिमणीवर ठाण मांडून असलेले 2 महिला व 5 पुरुष आंदोलक अजुनही तिथेच असुन काही आंदोलकांची प्रकृती खालावत असल्याचे वृत्त हाती आले आहे. हे आंदोलक चिमणीवर ज्या ठिकाणी ठिय्या देऊन बसले आहेत त्या ठिकाणी नैसर्गिक विधी करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने त्यांचे हाल होत आहेत त्याचप्रमाणे ह्या आंदोलकांना जेवण व पाणी देखिल पुरेशा प्रमाणात मिळत नसून आतातर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पथकाने चिमणीला वेढा घातला असुन कुणालाही जवळपास येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही ह्यामुळे वर बसलेल्या आंदोलकांना इतर आंदोलक पाणी किंवा जेवण पुरविण्यास असमर्थ ठरत आहे.


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या मार्फत व्यवस्था करण्यात येत असुन आंदोलकांनी मात्र इतर प्रकल्पग्रस्तांना पाठविण्याची मागणी केली आहे. ह्याउलट प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी खाली येऊन जेवण व पाणी वर नेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले असुन त्यालासुद्धा नकार देण्यात आल्याने स्थिती बिकट झाली आहे.

चिमणीवर असलेल्या आंदोलकांची प्रकृती खा लावल्यास खबरदारीचा उपाय म्हणुन वैद्यकीय चमू तैनात केली असल्याचे कळले आहे.

काल ही कोंडी फोडण्यासाठी स्थानिक अधिकारी तसेच आंदोलकांचे प्रतिनिधी ह्यात जवळपास 5 तासाची मॅरेथॉन चर्चा झाली परंतु त्यात कुठलाही ठोस निर्णय झाला नसून अजुनही परिस्थिती जैसे थे आहे हे विशेष


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने