Bhairav Diwase. Aug 16, 2020
मुल:- मारोडा येथील गजानन गुरनूले यांनी करवन भागातील धनबोडी या शिवारातील शेतात काम असताना वाघाने मागून वार करून जखमी केले. आता शेतीचे हंगाम चालू आहे शेतीच्या कामा साठी सकाळी 8 वाजता घरून निघाले आणि शेतीच्या कामाला सुरवात केली दुपारच्या सुमारास 2 ते 2.30 वाजता वाघाने गजानन गुरनूले यांना मागून येऊन वार केला त्यांच्या सोबत एक दोन गावातील लोक होते व ते आरडा ओरड केले व वाघाच्या तावडीतून सुटका केले नंतर मारोडा क्षेत्रातील वन विभागाचे वनरक्षक श्री ठाकरे सर , व व श्री उईके सर माहिती मिळाली लगेच ते प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे नेऊन प्राथमिक उपचार केला व घरच्यांना माहिती करून लगेच उपजिल्हा रुग्णालय मुल येथे हलविण्यात आले आता तिथे उपचार सुरू आहे गजानन गुरनूले यांची परिस्थिती गरिबीची आहे तरी शासनाने त्वरित निधी द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे