शहरातील फुकट नगर येथील घटना.
Bhairav Diwase. Aug 10, 2020
भद्रावती:- शहरातील फुकट नगर येथे राहणाऱ्या साळ्याच्या पत्नीने घेतलेले उसने पैसे दिले नसल्याने तिच्या घरी जाऊन चाकूने वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजता घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.संगीता प्रकाश कांबळे वय ४० वर्ष राहणार फुकट नगर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून भालचंद्र रामजी मून वय ६० वर्ष असे आरोपीचे नाव आहे. संगीता ही गेल्या काही महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे रहात आहे. तिचे भद्रावती येथील फुकट नगर येथे घर असून ती रविवारला भिशीचे पैसे भरण्याकरिता आली होती. बाजूलाच तिच्या पतीच्या भाटव्याचे घर आहे. त्यांच्याकडून संगीताने काही महिन्यापूर्वी दहा हजार रुपये उसने घेतले होते ते मागण्यासाठी भालचंद्र हा नेहमी तगादा करायचा घटनेच्या दिवशी संगीता ही घरी आली असल्याचे त्याला कळले व त्यांनी पैसे मागण्यासाठी तिचे घरी गेला यात वाद निर्माण झाला भालचंद्र ने हातातील चाकुनी संगीताच्या पोटावर वार करून जखमी केले. उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार सुनील सिंग पवार घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला अटक करून हत्ते करीता ता वापरलेले हत्यार जप्त केले असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.