Top News

ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले.


तिनही आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत.
Bhairav Diwase. Aug 10, 2020





(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल लंपास करणाऱ्या तिघांना अवघ्या दोन तासात रामनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. आरोपीकडून 10 हजारांची रोख व सहा हजारांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. प्रकाश प्रेम राजपूत 22 रा. शांतीनगर बंगाली कॅम्प, राहुल चित्तरंजन खैरातील 22 रा. बंगाली कॅम्प व रोहित राजेश शेट्टी 26 रा. इंडस्ट्रीयल परिसर चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मूल-चंद्रपूर रस्त्यावर शुक्रवारी रात्री एका ट्रकचालकाला थांबवून त्याच्याकडून 10 हजार रुपये व दोन मोबाईल चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. आरोपी निघून गेल्यावर याबाबत ट्रक चालकाने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंदवून वेगाने तपास चक्र फिरविले. अवघ्या काही तासातच तिनही आरोपींना अटककरून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रकाश हाके, यांच्या नेतृत्वात अधिकारी खैरकार, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, पोहवा कामडी, नापोशि चौधरी, चिकाटे यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने