Top News

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी करते कंत्राटी कामगारांवर अन्याय:- सूरज ठाकरे यांचा पत्रकार परिषद आरोप.

Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर येथे काम करणार्‍या कंत्राटी कामगारांच्या विविध मागणीकडे कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून हा अन्याय असल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते सुरज ठाकरे यांनी व्यक्त करीत कामगाराचे शोषण होत असल्याचा आरोप केला आहे. नांदा फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क कार्यालय आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की कंपनीतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत काही, कंपनीतील कंत्राटी बि. एस. आर. कामगारांना कायमस्वरूपी सेवेत स्थायी करण्यात आलेलं नाही. कंत्राटी कामगारांना वेजबोर्ड प्रमाणे वेतन दिले जात नाही. बेरोजगारांना प्राधान्य नाही तसेच इतर सिमेंट कंपनी प्रमाणे कंत्राटी कामगारांना जेवनाची, आरोग्य, ग्रॅज्युएटी, पेंशन आदी दिल्या जात नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन देण्यात यावे दत्तक गावातील नागरिकांसाठी कंपनीच्या रुग्णालयात 24 तास उपचार करण्यात यावा, कमी करण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली इतर इतर कंपन्या मध्ये दिवसाला ७३९ रुपये कामगारांना श दिल्या जाते तर दुसरीकडे अल्ट्राटेक कंत्राटी कामगाराला मात्र ३५० ते ४५० रुपयात काम करावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे सुरक्षेसंबंधी साहित्य कंपनी आधी प्रमाणे पुरवठा करीत नसल्याचे ते म्हणाले. या मागण्या त्वरित कंपनी प्रशासनाने मान्य कराव्या अन्यथा येत्या १५ दिवसात आंदोलन करण्याचा इशारा सुरज ठाकरे यांनी दिले आहे.

शेती गेली पण नोकरीसाठी शेतकऱ्यांची पायपीट कायम.

एल अँड टी कंपनीचे सध्या अल्ट्राटेक रवींद्र रागोबा जोगी पिंपळगाव अनिता मुरलीधर सिडाम नोकारी या दोन शेतकऱ्यांची शेतजमीन नोकरीच्या लेखी आश्वासने देऊन जमीन संपादित केली. मात्र शेतजमीन घेऊनही शेतकर्‍यांना आजपावती स्थायी नोकरीत समावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला प्रहार जनशक्ती पक्षाचे युवानेते सुनील डवस, समिर देवघरे, नितेश बेरड, रोशन हरबडे, आशिष कुचनकर, मोहबत खान, दशरथ राऊत आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने