पशुवैद्यकीय दवाखाना उमरी पोतदार यांनी आंबेधानोरा येथे लंप्पी रोगापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी शिबीर.
Bhairav Diwase. Aug 15, 2020
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्गजन्य रोग लंपीस शेतकऱ्यांची झोप उडविलेली आहे. ऐन कामाच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झालेले आहे. लंप्पी हा रोग संसर्गजन्य असल्याने आजारी जनावरांची संख्या फार झपाट्याने वाढत आहे.
सर्वत्र जनावरांना लंप्पी या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने वाढत चाललेला आहे. जनावरांना लंप्पी रोगाचे विविध लक्षणे आढळून येत असल्याने केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात विविध ठिकाणी जनावरांची तपासणी केली जात आहे. पशुवैद्यकीय दवाखाना उमरी पोतदार यांनी आंबेधानोरा येथे लंप्पी रोगापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी शिबीर घेण्यात आले. सदर शिबिर ला भेट देऊन सर्व शेतकऱ्यांना शिबिराच्या माध्यमातून जनावरांचे रक्षण करण्याचे आव्हान स्थानिक नागरिकांना करण्यात आले.