ग्रामपंचायत चेक आष्टा येथील सॅनिटाझर मशीन चे लोकार्पण व जनावरांच्या आरोग्य शिबिराला भेट.
Bhairav Diwase. Aug 18, 2020
पोंभुर्णा:- केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. राहुल संतोषवार यांनी भटारी येथील सुरू असलेल्या शबरी घरकुलाच्या बांधकामांची पाहणी केली. माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली शबरी घरकुल योजने अंतर्गत भटारी येथे 41 घरकुल मंजूर करण्यात आले होते. सदर घरकुलाच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झालेली असून काही घरकुलाचे काम हे पूर्णत्वास आलेले आहेत.
ग्रामपंचायत चेक आष्टा येथे कोरोना वर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १४ वा वित्त आयोग अंतर्गत सॅनिटाझजर मशिन घेण्यात आली. त्या मशीन चे अनावरण श्री. राहुल संतोषवार सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित श्री. जयंत पिंपळशेंडे, सरपंच ग्रा. प.चेक आष्टा सौ. कांताताई मडावी, उपसरपंच ग्रा.प. चेक आष्टा व इतर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चेक आष्टा येथे लिंपी या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांच्या शिबिराला भेट देण्यात आले. सर्वांनी या शिबिराच्या माध्यमातून आपल्या जानावरांना शिबिराला आणून त्यांचा उपचार करावे असे आव्हान करण्यात आले.